बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो.मंगळवारी मराठा लाईट इन्फंट्री सेंटरची मूर्ती सेंटरमध्ये नेण्यात आली.मराठा लाईट इन्फंट्रीच्या सार्वजनिक गणेश मूर्तीचे
वैशिष्ठ्य म्हणजे दरवर्षी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.सहा फूट उंचीची मूर्ती सेंटरचे जवान आणि अधिकारी यांनी ट्रॅक्टरमधून मूर्तिकाराकडून नेली.
उद्या लष्कराच्या मिलिटरी महादेव मंदिर येथे प्रतिष्ठापना करून मराठा लाईट इन्फंट्री सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते विधिवत पूजन केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ मूर्तिकार परशराम पालकर हे मराठा लाईट इन्फंट्री सेंटरची शाडूची गणेश मूर्ती तयार करत आहेत.