ॲपटेक एव्हिएशनच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी
बेळगाव:अथट परिश्रम करून तसेच ॲपटेक एव्हिएशन आणि हॉस्पिटलिटी अकॅडमी मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून जम्मू काश्मीर येथील युवक श्री डनक कुमार श्री गुरु रामदास जी इंटरनॅशनल विमानतळ अमृतसर,इंडिगो एअरलाइन्स मध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून निवड झाली आहे.तसेच हवेली जिल्ह्यातील नंदिहळ्ळी येथील श्री मधुसूदन एफ. तलवार यांची निवड छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईसाठी एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
त्यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन ॲपटेक एव्हिएशनच्या कार्यालय मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बीजेपी युवा मोर्चा महानगर बेळगावचे सरचिटणीस दिग्विजय सिद्धनाळ,ॲपटेक लिमिटेड पायोनियर मुंबई विभागीय प्रमुख श्री. इरफान खान, ॲपटेक एव्हिएशन ऍकॅडमी बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या एम.डी सौ.ज्योती विनोद बामणे उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.