प्रादेशिक आयुक्त म्हणून शेट्टन्नावर एस पी यांची नियुक्ती
बेळगाव विभागाचे नूतन प्रादेशिक आयुक्त म्हणून हट्टी गोल्ड माईन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शेट्टन्नावर एस पी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सध्याचे प्रभारी प्रादेशिक आयुक्त तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचा आदेशांना बजाविण्यात आला आहे.
31 मे रोजी तत्कालीन प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली होती. तर आता बेळगावचे प्रादेशिक आयुक्तपदी शेट्टण्णावर यांची नियुक्ती झाली आहे