विद्यार्थ्यांना आवाहन
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. यावर्षी ३०० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सीमाभागातील दानशूर संस्था, शिक्षणप्रेमी, मराठी भाषाप्रेमी यांनी आपली मदत अथवा शैक्षणिक साहित्य टिळकवाडी येथील कावळे संकुल येथे असणाऱ्या म. ए. युवा समिती कार्यालयात जमा करावे. म. ए. युवा समितीच्यावतीने मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
बेळगाव जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचविला जात आहे. पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते. यावर्षीही हा उपक्रम राबविला जाणार असून अधिक माहितीसाठी अध्यक्ष अंकुश केसरकर (९०३६३७८११५), सचिन केळवेकर (७०१९३३३०२०) या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.