सीमा प्रश्न बाबत शांतता राखण्याचे आवाहन
सीमा प्रश्नाबाबत सातत्याने वाद होत आहेत. या वादाचे पडसाद कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये होत आहे. तसेच एकाने जर काही केल्यास दुसरा शांत न बसता हम भी किसीसे कम नही हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे सर्वांमध्ये खटके उडत आहेत .त्यामुळे सीमा प्रश्न बाबत शांतता राखण्याचे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी व्यक्त केले.
आज टिळकवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड रक्षण वेदिका तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती यावेळी ते या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी ते म्हणाले की कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद संदर्भात सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देईपर्यंत बेळगाव सह सीमा भागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
हे सर्व करत असताना नागरिकांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सीमा प्रश्न हा न्यायालयात चालू आहे त्यामुळे तेथील उच्च स्तरावर त्याचा निकाल होईल मात्र आपण सीमाभागात कोणताही वाद न घालता शांतता प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले.
तसेच कोणत्याही गटाने आपला राग कुठेही न व्यक्त करता शांत डोक्याने विचार करून नागरिकांना सुरक्षित ठेवावे असे देखील यावेळी ते म्हणाले की उगाचच बसवर दगडफेक करणे शाई फेकणे असे प्रकार करून सीमा प्रश्न सुटणार नाही यामुळे प्रकरण आणखीन तापेल असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि उच्च स्तरावर सरकार आणि प्रशासनाला मराठी भाषकांची सहकार्य करण्याची विनंती याप्रसंगी केली. याप्रसंगी बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रप्पा, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी, मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, तालुका म. ए. समितीचे सचिव अॅड. एम. जी. पाटील, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण – पाटील तसेच कन्नड रक्षण वेदिके आणि अन्य कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते