बेळगांव जीएसएस कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन शिकणाऱ्या 43/2, पाटील गल्ली, जुना पीबी रोड, खासबाग येथील अनाथ व गरीब कुटुंबातील नम्रता अनिल हलगेकर (रजि. क्र. U15BL23S0405) मोबाईल क्रमांक +917483669513 या काॕलेजच्या हुषार विद्यार्थीनीला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी विद्यार्थीनीच्या काॕलेजची शैक्षणिक फी भरून मदत करावी.
सदर विद्यार्थीनीचे 1 ले सेमीस्टर SGPA: 7.63 आणि CGPA: 7.63 सह यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहे. आॕगस्ट महिन्यात 2 ऱ्या सेमीस्टर परीक्षा देणार आहे. त्याअगोदर सदर काॕलेजची फी भरणे गरजेचे आहे, तरी सामाजिक संघटनांनी व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी. नम्रता हलगेकरही एक अनाथ मुलगी आहे, काही वर्षांपूर्वी तिचे आई-वडील दोन्ही वारले आहेत., सद्या तिच्या कुटुंबात तिच्यासह 1 मोठी बहिण, 2री लहान बहीण आहे आणि 1धाकटा भाऊ अशी 4 भावंडे आपल्या 75 वर्षांच्या आजीकडे छोट्याश्या घरात राहतात. कुटुंबात उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही त्यामूळे जगण्यासाठी ओढाताण होत आहे.
गरीब कौटुंबिक स्थिती व आई-वडीलांचे छत्र नसलेल्या परिस्थितीत सदर विद्यार्थीनीला तिच्या महाविद्यालयीन फी चे व्यवस्थापन करणे फार कठीण होत आहे. ती तिचे करिअर करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यास अभ्यास करण्यास तयार आहे,
परंतु परिस्थितीपूढे तिला अशक्य वाटत आहे. कसे तरी लोकांकडून पैसे उधार घेऊन, तिने तिचा काॕलेजची प्रवेश फी आणि 1ल्या सेमीस्टरचे शुल्क भरले आहे, पण 2ऱ्या व पुढील (3+4+5+6) सेमीस्टरची फी भरणे हे तिच्यासाठी असह्य होत आहे. त्यामुळे, या अनाथ मुलीला पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी समाजातील दानशूरांच्या पाठिंब्याची गरज आहे. जेणेकरून तिचे करिअर घडवू शकेन आणि ती खात्री देत आहे की ती शैक्षणिक क्षेत्रात तिची सर्वोत्तम कामगिरी करेल आणि करिअरच्या मार्गावर यशस्वी होईल.
तुमच्या पाठिंब्याची पुन्हा एकदा माझी नम्र विनंती.