अपूर्वा पोवार व वेदांत हतकर यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
कर्नाटक सरकार व डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन कर्नाटका यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर रोजी चिकमंगळूर येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी विभागातून निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये अपूर्वा पवार 63 किलो आतील वजन गटात सुवर्णपदक ,पटकावले तर वेदांत हटकर या विद्यार्थ्याने 78 किलो वरील वजन गटात सुवर्णपदक पटकावले, तसेच पुष्पा पाटील हिने 49 किलो आतील वजन गटात कास्य पदक पटकावले सुवर्णपदक पटकवलेल्या विद्यार्थ्यांची मध्य प्रदेश येथे होणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे निपाणी व निपाणी परिसरातून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशिक्षक श्री बबन निर्मले व विजय नाईक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.