*अनुष्का राजीव पाटील हिला “नवदुर्गा सन्मान” पुरस्काराने सन्मानित*
बेळगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन आयोजित समारंभात राज्यस्तरीय नवदुर्गा विजय उत्सव सन्मान सोहळा रविवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक एसपीआर जवळ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनुष्का राजीव पाटील वय वर्ष 15 हिला “नवदुर्गा सन्मान” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.https://dmedia24.com/demand-for-action-against-those-who-mourn-the-atmosphere-by-giving-controversial-linguistic-color/
नुकत्याच पार पडलेल्या 18 वर्षाखालील गटा मधील फॅशन शोमध्ये आपल्या आईनी बनवलेला ड्रेस घालून फॅशन शो मध्ये भाग घेतला त्यामध्ये कुमारी अनुष्का राजू पाटील हिने “मिस बेळगाव 2025” किताब पटकावला. त्याचप्रमाणे ती अनुष्का पाटील या नावाने युट्युब चैनल सुद्धा चालवते. अनुष्का पाटील हिने अत्यंत लहान वयात भाषण स्पर्धा , गायन स्पर्धा, लेखन स्पर्धा,बुद्धिबळ सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले नाव लौकिक केले आहे.मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. सर्व गोष्टी लक्षात घेऊन नवदुर्गा विजयोस्त्व सन्मान सोहळ्यात तिला यंदाचा प्रतिष्ठेचा “नवदुर्गा सन्मान” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
कुमारी अनुष्का पाटील यांची आई प्रिया पाटील या स्वतः फॅशन डिझायनर आहेत. त्या “धागा” या नावाने फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट चालवतात त्याचप्रमाणे स्वतः फॅन्सी कपडेसुद्धा शिवून देतात.
अनुष्का पाटील मुळशी सुंडी गावातील असून सध्या हिंडलगा येथे राहत आहे. तिला नवदुर्गा सन्मान पुरस्कार दिल्याने तिचे सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.वडील राजीव पाटील,आजोबा व आदर्श शिक्षक झिम्माना पाटील, प्रसिद्ध उद्योजक जोतिबा आंबोळकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.