निट्टूर येथील अनुजा लोहारची साहित्य संमेलनासाठी निवड
उत्तूर (ता. आजरा) येथील ७व्या त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये श्रीमान व्ही. पी. देसाई ज्युनिअर कॉलेज कोवाडच्या कु. अनुजा दत्तात्रय लोहार (इयत्ता-अकरावी सायन्स) हिने स्वरचित ‘काय माहित कधी सुरू होणार शाळा’ या कवितेचे काव्यवाचन केले. रविवार दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी उत्तर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात बालसाहित्य मेळावा संपन्न झाला. या स्पर्धेसाठी शाळेतील प्राचार्य, प्राध्यापक, आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले. या निवडी मुळे तिचे सर्वत्र स्तरावर कौतुक होत आहे.