जायंट्स मेनच्या वतीने तंबाखू विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन
संपूर्ण जगभरात सिगारेट, मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे जणू आता शरीराच्या सवयीचा भाग झाला आहे. कोणी तणावमुक्त जगण्यासाठी तर कोणाच्या जीवनात वाईट प्रसंग घडल्यावर, कोणी अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतो आणि त्याची चटक लागली की त्या व्यसनाच्या आहारी जातो.
खासकरून तंबाखू सेवन सिगारेट आणि गुटखा खाल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागते.या गोष्टींचा विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सगळीकडे जनजागृती करण्याचे आवाहन केले.
त्यानुसार जायंट्स ग्रूप ऑफ बेळगाव मेनने तंबाखू विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते.
बेळगाव तालुक्यातील अतिवाड आणि बेकीनकेरे या गावात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कोणकोणते दुष्परिणाम होतात याबद्दल माहिती देऊन त्याचे सेवन करू नये असे आवाहन करण्यात आले.
यावेळी आवाहन करणारे फलक हातात घेऊन दुचाकीवरून रॅलीसुध्दा काढण्यात आली. यावेळी छोड दो छोड दो गुटखा खाणा छोड दो, सिगारेट सेवन करू नका जीवनाला मुकू नका. तंबाखू हटाओ जीवन बचाओ आणि तंबाकू से नाता तोड़ो, जीवन से नाता जोड़ो अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून सोडण्यात आले.
शेवटी उचगाव येथील मळेकरणी हायस्कूलमध्ये सांगता करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष सुनिल मुतगेकर, मुख्याध्यापक पाटील,सचिव लक्ष्मण शिंदे यांनी आपले विचार मांडले पुंडलिक पावशे यांनी सूत्रसंचालन केले तर अविनाश पाटील यांनी आभार मानले
या रॅली मध्ये अध्यक्ष सुनिल मुतगेकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील, अरूण काळे, सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसुर, अशोक हलगेकर, संजय पाटील,मुकुंद महागावकर, राहुल बेलवलकर, सुनिल चौगुले, मधू बेळगावकर, अजित कोकणे, बाळकृष्ण तेरसे, प्रकाश तांजी, यल्लाप्पा पाटील, भास्कर कदम,भरत गावडे,आनंद कुलकर्णी, पुंडलिक पावशे,महेश रेडेकर, पद्मप्रसाद हुली संभाजी देसाई व इतर सदस्यांनी सहभाग नोंदवला.