महिलांना रोजगार देण्याकरिता एंजल फाउंडेशन ने घेतला पुढाकार
महिलांना काम मिळावे तसेच त्यानी घराबाहेर पडून आपल्या पायावर उभे राहावे या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकाम विणकाम तसेच पापड तयार करणे याशिवाय विविध कामांविषयी माहिती देण्यात आली.
सर्व महिलांना रोजगार मिळावा याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी शहरांमध्ये महिलांना रोजगार देण्याकरिता बैठका सुरू केल्या आहेत.
समर्थ नगर येथून त्यांनी या बैठकीला सुरुवात केली यावेळी महिला मंडळ सोबत त्यांनी चर्चा केल्या आणि कशाप्रकारे आपण काम करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी त्यांनी श्री रेणुका देवी महिला मंडळ ,श्री लक्ष्मी महिला मंडळ ,श्री साई महिला मंडळ, श्री दुर्गा दुर्गाश्वरी महिला मंडळ, समर्थ महिला मंडळ ,रिद्धी सिद्धी महिला मंडळ या मंडळामधील सर्व महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले.