बेळगाव: शहराच्या मध्य ठिकाणी असलेल्या किल्ला तलाव येथे अनोखा व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीने किल्ला तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी मृतदेह किल्ला तलावातील पाण्यावर तरंगत असताना नागरिकांना दिसून आला.तात्काळ नागरिकांनी पोलिसांना कळविले. घटनास्थळी मार्केट पोलिसांकाच्या पथकाने धाव घेऊन मृतदेह तलाव बाहेर काढण्यात आला.अजून त्या व्यक्तीची ओळख पटली नसून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.