कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये शरद गोरेंचा एक प्रेरणादायी प्रवास सूर्या चित्रपट झळकणार
*ज्ञान हे विशाल महासागरासारखे आहे; जेवढे घ्याल तेवढे कमीच : शैक्षणिक आधारित चित्रपट; विद्यार्थ्यांना प्रेरणादायी*
बेळगाव, तारीख 12 ऑगस्ट 2024 : ( प्रा . निलेश एन. शिंदे बेळगाव ) : ज्ञान हे विशाल महासागरासारखे आहे; जेवढे घ्याल तेवढे कमीच आहे. मानव जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपण नेहमी विद्यार्थीच असतो जेवढे ज्ञान घ्याल तेवढे कमीच असल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत नवनवीन शिकण्याचा नेहमीच प्रयत्न करायला हवा; आणि शेवटपर्यंत शिकत राहणार हे अत्यंत महत्त्वाचे असून ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ शस्त्र आहे. शैक्षणिक आधारित एक ज्वलंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची जीवनकथा या चित्रपटातून मांडण्यात आले आहे आजच्या संपूर्ण जगभरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे हे चित्रपट ठरले आहे. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची जीवनातील अगतिकता आणि विशाल असे ध्येय प्राप्त करण्यासाठी केलेले धडपड प्रामाणिक प्रयत्न चिकाटी मेहनत कार्यात सातत्य ज्ञानावर विश्वास दृढ निश्चय करून अतिशय गरीब कुटुंबात हाल अपेष्टा त्रास कष्ट सहन करून मिळविलेल्या आयएएस IAS – ( UPSC ) परीक्षेत प्राविण्य मिळवून हा एक जगातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठरले आहे.
सुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक शरद गोरे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत “एक प्रेरणादायी प्रवास सूर्या”या मराठी चित्रपटाने 2024 मध्ये प्रतिष्ठित फ्रान्स देशातील कान्स चित्रपट महोत्सवात official निवड झाली आहे हा चित्रपट एका शेतकरी कुटूंबातील गरीब विद्यार्थ्याचा संघर्षमय प्रवास सांगणारा हा चित्रपट आहे अनेक संकटांशी झुंज देत IAS होऊन कलेक्टर होण्याचे स्वप्न साकार करतो,जगभरातील 2000 चित्रपटातून टॉप 50 चित्रपटांमध्ये निवड या महोत्सवासाठी झाली आहे यातून वितेत्यांची निवड होणार आहे,
‘सूर्या’ ची त्याच्या अनोख्या प्रेरणादायी
कथानकासाठी प्रशंसा जात आहे,ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीरेखेचा
जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो असे चित्रपटाचे कथानक प्रेरणा,परिश्रम आणि दृढनिश्चय या विषयांभोवती विणलेले गेले आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या निवडीमुळे या चित्रपटात
काम करणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावान कलाकारांना ओळख मिळणार आहे.बार्शी,सोलापूर,अकलूज, कुर्डूवाडी,या सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे
आणि त्यात सुनील साबळे,अमोल कुंभार, सुजाता काळोखे, राहूल शिंदे यांनी हि आपल्या भूमिका सफाईदारपणे वटवल्या आहेत, प्रगती सूर्यवंशी , महारुद्र जाधव
फुलचंद नागटिळक,प्रकाश गव्हाणे आदी जण पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत,
‘सूर्या’मागील बहुआयामी प्रतिभा असलेल्या शरद गोरे यांनीही खलनायकाची भूमिका खूप सशक्तपणे
साकारली आहे शरद गोरे,प्रकाश बनसोडे,सूवर्णा पवार यांची गीते असून शरद गोरे यांनी संगीतबध्द केले आहे,तर चित्रपटाचे छायांकन रवींद्र लोकरे यांनी केले आहे तर शरद मधुकर गोरे व नितीन रतीलाल पाटील हे चित्रपटाचे निर्माते आहेत, प्राची सूर्यवंशी मुख्य अभिनेत्री असून या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका नितीन रतीलाल पाटील यांनी कलेक्टरची भूमिका खूप प्रभावीपणे साकारली आहे, नील पाटील,विक्रांत नळे यांनी बालपणातील सूर्या उत्तम साकारला आहे,चित्रपटाचे यश हे त्याच्या दूरदृष्टीचा आणि कथाकथनाच्या समर्पकपणाचा पुरावा आहे. या अगोदर रणांगण एक संघर्ष, उषःकाल,प्रेमरंग आदी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शरद गोरे यांनी केले आहे,
‘सूर्या’ हा एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी चित्रपट आहे जो जगभरातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याची ओळख हा भारतीय सिनेमासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे या प्रेरणादायी प्रवासाच्या
सामर्थ्याला सलाम आहे. बेळगाव येथे मराठी अस्मिता संस्कृती परंपरा मराठी भाषा संवर्धनाचे मोठे कार्य या ठिकाणी बेळगाव सीमा भागात केले जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलन भरून माय मराठी चे संवर्धन करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला जातो आणि तो आजही करत आहे. बेळगाव येथील 25 पेक्षा अधिक साहित्य संमेलने भरवली जातात त्यामध्ये माय मराठीचा जागर अखंडपणे तो आजतागायत अविरत असे कार्य मोठ्या थाटात पार पाडले जाते. साहित्यिक ज्येष्ठ विचारवंत कवी दिग्दर्शक शरद गोरे यांनी देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माय मराठीचा जागर संवर्धन आणि संस्कृती जपण्याचे मोठे अविरत असे कार्य केले आहे त्यामध्ये बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बेळगाव या शीर्षकाखाली गेल्या पाच वर्षापासून साहित्य संमेलने भरून ती यशस्वी केलेली आहेत. बेळगावकरांनी अतिशय मोठा प्रतिसाद देऊन वेगवेगळी ही 25 पेक्षा अधिक साहित्य संमेलने सीमा भागात यशस्वी केलेले आहेत. – विशेष लेखन कवी प्रा. निलेश शिंदे बेळगांव.