*येळ्ळूर विभाग म ए समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 27/01/2025 रोजी सायंकाळी येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला येळ्ळूर मधील आजी माजी सदस्य ग्राम पंचायत तसेच गावातील ,जेष्ठ,व शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी येळ्ळूर विभाग म ए समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी उपस्थित युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला होता.जास्तीत जास्त युवाना कमिटी मध्ये स्थान देण्यात यावे व पुढील काळात युवा वर्ग समितीशी एकनिष्ठतेणे काम करेल असे विचार काही युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
यावर चर्चा करण्यासाठी पुढील सोमवारी दिनांक 03/02/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 पुन्हा बैठक होणार असून या बैठकीला सर्व युवा,जेष्ठ,आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे यावेळी याबैठकीचे अध्यक्ष शांताराम कुगजी होते तसेच माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील,ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील,माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, शेकाप चे विलास घाडी सर, वाय सी इंगळे ,परशराम घाडी,तानाजी हलगेकर, ग्राम पंचायत सदस्य,सदस्या,माजी ग्राम पंचायत सदस्य, जेष्ठ नेते व समितिनिष्ठ ,शेकडो युवा कार्यकर्ते, उपस्थित होते.*