पोलीस प्रशासन, लोकमान्य सार्वजानिक श्री गणेशोत्सव महामंडळ, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, शहापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पोलीस आयुक्तालयामध्ये पार पडली.
यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त डॉ एस एन सिद्धरामप्पा ,कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस आयुक्त एस टी शेखर तसेच यावेळी पोलीस उपायुक्त रहदारी वाहतूक पोलीस ठाण्याच्या आणि कायद्या विभागाच्या विभाग प्रमुख डीसीपी पी व्ही स्नेहा उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव संदर्भात सूचना केल्या. त्या म्हणाल्या की यंदाचा गणेशोत्सव हा 11 दिवसांचा आहे त्यामुळे या 11 दिवसात सर्व मंडळांनी शांतता पाळणे गरजेचे आहे तसेच कायद्याचे उल्लंघन कोणत्याही मंडळांनी करू नये.
त्याचप्रमाणे विसर्जनामध्ये कोणत्याही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपला गाडा विसर्जन मिरवणूक मध्ये लावून जाऊ नये. मंडळांनी गणेश मूर्ती वेळेत विसर्जन कराव्यात.असे आवाहन त्यांनी बैठकी प्रसंगी केले.
त्यानंतर पोलीस आयुक्तांनी देखील परंपरेप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करा अशा सूचना केल्या जर गणेशोत्सव काळात डीजे चा वापर केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल त्यामुळे कारवाई करण्याआधीच सर्व गणेशोत्सव मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना डीजेचा वापर करू नये असे सूचना द्याव्यात अशी विनंती केली.
तसेच या बैठकीमध्ये गणेश उत्सव संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी या बैठकीस अनेक मंडळांचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी सूचनांचे आपण पालन करू अशी ग्वाही याप्रसंगी दिली.