This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ‘महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला ! – निपाणी येथे निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे मागणी !*

*हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ‘महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला ! – निपाणी येथे निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे मागणी !*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ‘महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला ! – निपाणी येथे निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे मागणी !

निपाणी – भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्‍वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवूण समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. असे असतांना अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान, तसेच ‘यशराज फिल्म्स’ यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी, या मागणीचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन निपाणीचे उपतहसीलदार श्री मृत्युंजय डंगी यांना देण्यात आले.

या प्रसंगी श्रीराम सेनेचे श्री अमोल चेंडके, बजरंग दलाचे श्री अजित पारळे,धर्मप्रेमी श्री बबन निर्मले,शिवप्रतिष्ठानचे श्री राजेश आवटे सनातन संस्थेचे श्री सुनील वाडकर,हिंदु जनजागृती समितीचे श्री जुगलकिशोर वैष्णव आणि कार्यकर्ता धर्मप्रेमी श्री अभिनंदन भोसले,श्री संतोष माने,श्री विशाल जाधव,श्री संतोष देवडकर,श्री आतिश चव्हाण, श्री रणजित तोरसकर,श्री प्रशांत घोडके,अक्षय वाघेला, श्री प्रणव जासूद,श्री विश्वनाथ भाट,श्री अजित पाटील,श्री सनी शिरगुप्पे,श्री चंद्रकांत पोळ श्री राजू कोपार्डे.
श्रीसंदेश शिंदे,श्री समर्थ पाचंगे,श्री ओमकार बाळूंदे,श्री प्रवीण तमन्नावर, हे उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्याच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटात भगवान शिवाविषयी अपमानास्पद दृष्ये आणि आक्षेपार्ह संवाद दाखवले होते. हिंदु संतांना गुंड म्हणून दाखवले होते. आता तोच प्रकार ‘महाराज’ या चित्रपटातून त्याचा मुलगा करत आहे. 150 वर्षापूर्वी इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून आज पुन्हा साधूसंत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचे चित्रण उभे केले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची बदनामी करण्याचे षड्यंत्र केले जात आहे. या चित्रपटात साधू-संत हे दुराचारी आणि वासनांध असतात, असे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सर्वस्वी जुनैद खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे जबाबदार असतील.

जुनैद खान, अमिर खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे मदरश्यांमध्ये मौलवींद्वारे होणारे मुला-मुलींचे लैंगिक शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का?, लहान मुलांची माथी भडकवून त्यांना जिहादी कृत्यांसाठी प्रोत्साहित केले जाते, त्यांच्याकडून आतंकवादी आणि देशविघातक कृत्ये कशी करवून घेतली जातात, या विषयावर चित्रपट बनवतील का? चर्च वा चर्चप्रणीत वसतीगृहामध्ये ख्रिस्ती धर्मगुरुंकडून होणारे मुले आणि महिलांचे शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का? अशा विषयांवर चित्रपट काढण्याचे धाडस बॉलीवूड करणार नाही; मात्र हिंदु संतांना, हिंदु धार्मिक कृत्यांना सहजतेने लक्ष्य केले जाते. हिंदु सहिष्णु असल्याने आणि ‘सेक्युलरिझम’ च्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवले जाते. हे कदापि सहन केले जाणार नाही. या चित्रपटाच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये. सरकारने या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी. तसेच देवता, धर्म, संत आदींचा अवमान रोखण्यासाठी ‘ईशनिंदा विरोधी कायदा’ देशभरात लागू करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24