अमन सुनगार यांचे सब ज्युनियर व ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत यश
बेळगांव:जलतरण क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावमधील अमन सुनगार यांने 6 ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत भुवनेश्वर, ओडिशा येथे झालेल्या 40 व्या सब ज्युनियर आणि 50 व्या ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये भाग घेउन त्याने कर्नाटक संघासाठी रोमहर्षक कामगिरीचे प्रदर्शन करून 4X100 मेडले रिले मध्ये सुवर्णपदक जिंकले.
अमन सुनगार हा श्री.अभिजीत सुनगार आणि सौ वसुंधरा सुनगार यांचा मुलगा असून तो सेंट पॉल्स हायस्कूल बेळगाव येथे शिकत आहे.
अमनने जलतरण क्षेत्रात अतुट समर्पण आणि मेहनत दाखवली.ऑलिम्पिक आकाराच्या सुविधेने सुसज्ज असलेल्या बेळगांव येथील KLE च्या सुवर्णा JNMC जलतरण तलावात त्याला उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले.
डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी), श्री. जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), Rtn. अविनाश पोतदार, श्रीमती.मानेक कपाडिया, श्रीमती. लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर, आणि इतरांनी त्यांच्या दृढ समर्थन आणि प्रोत्साहनासाठी.