गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, गावात कोणतीच समस्या दिसू देणार नाही असे उद्गार ग्राम पंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी काढले.
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील गटारी अन भूमिगत गटारींच्या कामांचे उद्घाटन, प्रसंगी ते बोलत होते. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या ८ लाखांच्या निधीतून हे विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत अध्यक्ष,सदस्य व ग्रामस्थांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. विकासकामांमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील स्वराज्य गल्ली येथील गटारी व भूमिगत गटारीचे बांधकाम केले जाणार आहे.
ग्रामपंचायतीला मिळणारा १५व्या वित्त आयोगाचा संपूर्ण पैसा विकासासाठी खर्च केला. शिवाय गावाच्या प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत सुसज रस्त्याचे काम झाले आहे. गावाला पाण्याचे कमतरता भासणार नाही अशी व्यवस्था व स्मशानातील विकास राबविण्यात आले आहे. शिवाय आणखी काही काम असतील तर जनतेने थेट संपर्क साधा असे या वेळी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेसाठी राखीव निधीही खर्च केला आहे. भविष्यात हायटेक ग्राम पंचायात इमारत उभारणी केली जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी ग्राम पंचायात सदस्य संतोष कांबळे, बबलू नावगेकर, शीतल तारिहाळ्कर, चंद्रभागा जाधव, ग्रामस्थ कमिटी सदस्य पुंडलिक जाधव,जोतीबा मोरे,बंडू भाष्कळ,परशराम भाष्कळ,शंकर तारिहालकर, धनाजी कांबळे, दामु जाधव, चांगदेव जाधव, यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.