एका छताखाली मिळणार सर्व वैद्यकीय सुविधा:
अरिहंत हॉस्पिटल आता बनले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त अरिहंत हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.रुग्णसेवेच्या क्षेत्रात बेळगाव परिसरात अल्पावधीत नावारूपास आलेले अरिहंत हॉस्पिटल आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनले आहे. केवळ हृद्यरोगच नव्हे तर अन्य सर्व आवश्यक सुसज्ज विभागांसह रुग्णसेवेसाठी सज्ज झाले असल्याचे यावेळी डॉक्टर दीक्षित यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
सुप्रसिद्ध अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब तथा दादा पाटील यांच्या उपस्थितीत नेहरूनगर, बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये आज डॉक्टर्स डे समारंभ पार पडला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे एमडी आणि सीईओ डॉक्टर महादेव दीक्षित यांनी अरिहंत हॉस्पिटल आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनल्याची घोषणा केली. डॉक्टर दीक्षित म्हणाले की, हे हॉस्पिटल म्हणजे सहकार रत्न रावसाहेब तथा दादा पाटील, त्यांचे पुत्र अभिनंदन पाटील आणि उत्तम पाटील यांचे अपत्य आहे. कोरोना काळात ते सुरु व्हायचे होते. परंतु गेल्या वर्षी १६ ऑगस्टला त्याची स्थापना झाली.
अल्पावधीत ते आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनले आहे. या काळात आम्ही येथे सुमारे ६०० यशस्वी हार्ट ऑपरेशन्स, दोन हजार अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णांचा प्रतिसाद आणि मागणीवरून अन्य विभागही सुरु करण्याची गरज भासल्याने ते परिवर्तित करून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केले आहे. याठिकाणी आता न्यूरॉलॉजी, युरॉलॉजी व नेफ्रॉलॉजी, गॅस्ट्रो एंट्रोलॉजी, क्रिटिकल केअर, इमर्जन्सी मेडिसिन, जनरल फिजिशियन सेवा, रेडिओलॉजी आदी सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. विविध ठिकाणचे तज्ज्ञ डॉक्टर्स येथे उपलब्ध असतील. रावसाहेब पाटील, अभिनंदन पाटील आणि उत्तम पाटील तसेच हॉस्पिटलचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स, स्टाफ आदींच्या सहकार्याने हा टप्पा गाठणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच रक्तपेढी, कॅन्सर आदी विभाग सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले की, संस्थापक रावसाहेब तथा दादा पाटील यांनी १९९०मध्ये अरिहंत उद्योगाची स्थापना केली. आज व्यवसाय, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभे राहिलेल्या अरिहंत उद्योग समूहाने अरिहंत हॉस्पिटलच्या रूपाने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात आरोग्यसेवा देण्याच्या रावसाहेब पाटील यांच्या इच्छेनुसार हा निर्णय घेतला आहे.
. डॉक्टर एम डी दीक्षित हे आरोग्यसेवेतील एक अग्रणी नाव, बेळगावचे भूषण आहेत. त्यांची समर्थ साथ आम्हाला लाभली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय सेवा क्षेत्रात अरिहंत ग्रुप कार्यरत राहील. प्रत्येक तालुका केंद्रात अरिहंतची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. त्याची सुरवात निपाणी येथून करण्यात येईल असे सांगून त्यांनी अधिक माहिती दिली
यावेळी अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.