*काँग्रेसची सगळी बोगस आश्वासने :केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी*
शहरातील आज धर्मनाथ भवन मध्ये भाजपच्या उमेदवार निवडीबाबत पदाधिकारी मतदारसंघ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपलाच स्पष्ट सेना देश मिळणार असल्याचा दावा केला तसेच त्यांनी काँग्रेसचे गॅरंटी कार्ड बोगस आहे हे लोक जाणतात असे प्रतिपादन केले.
त्यानंतर ते म्हणाले की काँग्रेस जनतेला खोटी आश्वासने देण्यात माहीर आहे ते एका कुटुंबाला वर्षाला 78 हजार रुपये देतो असे नवे खोटे आश्वासन देत आहे तसेच नागरिकांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स कॉपी गोळा करत आहेत
देशात आणि राज्यातही काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आल्याची टीका करून काँग्रेस हा जनतेने रिजेक्ट केलेला पक्ष असल्याचे प्रल्हाद जोशी म्हणाले विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांना राज्यातील 224 मधून एकही मतदारसंघ मिळेनासा झालाय अशी टीका करून जोशी म्हणाले की, एकदा ते वरुणामधून लढतो म्हणतात तर एकदा कोलारमधून लढणार म्हणतात.
आता तर पराभवाच्या भीतीने या दोन्ही ठिकाणी लढणार म्हणतात. पित्यासाठी मुलाने मोठा त्याग केल्यास भासवीत आहेत. त्यांनी सर्व 224 मतदार संघातून निवडणूक लढवावी असा उपरोधिक सल्ला जोशी यांनी दिला.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत. कौटुंबिक, घराणेशाही चालविणारा पक्ष भाजप नव्हे. लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. साधारण येत्या 6-7 तारखेपर्यंत पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात येईल अशी शक्यता प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली.
कर्नाटकातही सत्ताकाळात त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत अशी टीका त्यांनी केली.विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांना राज्यातील 224 मधून एकही मतदारसंघ मिळेनासा झालाय अशी टीका केली.