भारतीय जनता पक्षातर्फे कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकार विरुद्ध आंदोलन छेडण्यात आले. पोलिसांच्या वाहनाला घेराव घालून मुख्यमंत्री सिद्धरामया, उप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिमांचे दहन करून भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.यावेळी एका भाजप महिला कार्यकर्तीने पोलिसांना न जुमानता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे छायाचित्र असलेले होर्डिंग फाडून आपला संताप व्यक्त केला.https://dmedia24.com/the-medium-of-films-is-effective-in-understanding-history-_-abhineta-santosh-juvekar/
कर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटात चार टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याचे ठरवले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सहाय्यधन वीस लाख वरून तीस लाख करण्याचा निर्णय कर्नाटकतील काँग्रेस सरकारने घेतला आहे.
भाजपच्या अठरा आमदारांचे सहा महिन्याच्या काळासाठी निलंबन काँग्रेस सरकारने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपने बेळगाव शहरात मोर्चा काढून रास्ता रोको केला. यावेळी संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या जीपला घेराव घातला होता. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.