8 सप्टेंबर रोजी भाजप रयत मोर्चाद्वारे सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा आज पत्रकार परिषदेत रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इराणा कडाडी यांनी दिला.
यासंबंधी आज कन्नड साहित्य भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की काँग्रेस सरकारने नव्या हमी योजना राबविल्या मात्र नवीन एपीएमसी कायदा किसान सन्मान योजना कृषी कायदा विद्यानिती योजना भोसरी योजना या श्रमशक्ती अशा शेतकऱ्यांच्या योजना बंद केल्या आहेत त्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे.
सरकारच्या शेतकरीविरोधी जनविरोधी धोरणाचे विरोधात आम्ही याआधी जिल्हास्तरावर आंदोलन केले आहे. तसेच आता सरकारच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणून देण्यासाठी आम्ही 8 सप्टेंबर रोजी सर्व तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यावेळी इराण्णा कडाडी यांनी सांगितले.
असेच पुढे दे म्हणाले की मला राजाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विचारायचे आहे की राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे 14 धरणांमध्ये पाहण्यासाठी कमी आहे शेतकऱ्यांच्या विहिरी किंवा बोरवेल पाणी घेण्यासाठी पुरेशा वीज मिळवत नाहीत. मुळे शेतकरी हातबल होऊन आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून देण्यासाठी सरकारने कामे करावीत असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले यावर या पत्रकार परिषदेत माजी आमदार आणि बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके माजी आमदार तसेच भाजक ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते
n68ztg
h990pg