*स्वागताध्यक्ष ॲड .सुधीर चव्हाण*
बेळगाव येथील म . ए . समितीचे युवा नेते व बेळगाव जिल्हा वकिल संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण हे चौथ्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी विराजमान होणार आहेत .
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित रविवार दि . 5 मार्च 2023 रोजी मराठा मंदिर येथे जेष्ठ साहित्यिका डॉ.अरुणा ढेरे यांनी संमेलनाध्यक्ष भूषविणार आहेत . सीमाभागात हा मराठीचा जागर होणार आहे.
ॲड.सुधीर चव्हाण हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे बेळगाव शाखेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या कालावधी हे चौथे मराठी साहित्य संमेलन चार सत्रात आयोजित करण्यात आले आहे .
बेळगाव क्षत्रिय मराठा परिषदचे जिल्हा सरचिटणिस , वकिल संघटनेत अनेक पदे भूषविली आहेत. विविध संस्था , पतसंस्था यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. सुराज्य निर्माण संघाच्या माध्यमातून अनेक सामूहिक विवाह सोहळा पार पडला आहे .
म. ए. समिती व मराठी कार्यकर्त्यांच्यावरील खटल्यांचे ते विनामोबदला न्यायालयीन कामकाज करतात तसेच रिंगरोडच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते पूर्णवेळ लढ्याची कायदेशिर बाजू सांभाळतात.
बेळगांव तालुक्यातील साहित्य संमेलनाला आर्थिक मदत सढळ हस्ते करतात . याबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिल जपत शैक्षणिक ‘ सांस्कृतिक , धार्मिक व राजकिय क्षेत्रात झोकून देऊन काम करत असतात.
मराठी भाषा , संस्कृती जतन करण्यासाठी ते कार्यरत असतात.