कॅम्प विभाग,टिळकवाडी विभाग यांचा अंतिम फेरीत प्रवेश.
बेळगाव तारीख ,24. टिळकवाडी येथील वॅक्सिंन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित बेळगाव शहर माध्यमिक क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी कम्प विभाग व टिळकवाडी विभाग यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजयी सलामी दिली.https://dmedia24.com/celebration-of-the-carate-belt-with-enthusiasm/
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅम्प विभागाने 8 षटकात 2 बाद 122 धावा केल्या त्यांच्या सचिन राजगोळकरने 69 धावा, चेस्टरने 13 धावा केल्या.शहापुर विभागातर्फे सचिन कुडची व चंद्रशेखर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शहापुर विभागाने 8 षटकात 4 बाद 92 धावा केल्या व सामना 31धावांनी गमविला त्याच्या सचिन कुडचीने 68 धावांचे योगदान दिले विभागातर्फे करताना ,नागराज भगवंतवण्णावर सचिन ,प्रकाश बजंत्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टिळकवाडी विभागाने 8 षटकात 9 बाद 92 धावा केल्या त्यांच्या अनिल जनगौडाने 28, 28 धावांचे योगदान दिले. उत्तर विभागातर्फे रियाज व प्रताप यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तर विभागाने 8 षटकात 8 बाद 88 धावा केल्या व सामना 4 गड्यानी गमाविला,या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे जिल्हाशिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ बेळगाव शहर . गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री उपमहापौर आनंद चव्हाण पुरस्कर्ते साईराज डेव्हलपरचे संचालक महेश फगरे ,अस्मिता इंटरप्राईजेस संचालक राजेश लोहार ,प्रेझेंट कॉन्व्हेंट शाळेचे अध्यक्ष यशोधर जैन, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमण्णाचे, क्रीडाभारती राज्यसचिव अशोक शिंत्रे, विश्वास पवार, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, राजू दळवी, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सिल्विया डिलिमा, राजू दळवी, वसंत हेंब्बाळकर या मान्यवरांच्या हस्ते भारतमाता फोटोपुजन, दिपप्रज्वलन व यष्टीपुजन श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विभागातील सेवानिवृत्त शिक्षक विवेक पाटील, उमेश कुलकर्णी, अशोक बुडवी, यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चंद्रकांत पाटील, जयसिंग धनाजी, बापू देसाई, प्रवीण पाटील, अर्जुन भेकणे रामलिंग परीट,बी जी सोलोमन, शिवकुमार सुतार,यश पाटील,कौशीक पाटील,अनिल जनगौडा, विठ्ठल मुळकूर,किरण तरळेकर, देवेंद्र कुडची, श्रीधर हिरेमठ, बापू देसाई, व उमेश मजुकर, कौशिक पाटील, नागराज भगवंतण्णावर , सचिन कुडची दत्ता पाटील,नामदेव पाटीलसह विविध शाळेचे क्रीडाशिक्षक उपस्थित होते. https://youtu.be/y9vTJkB0vnk?si=3OBJUdOEKTfiofZ6
फोटो ओळी
बेळगांव प्रमुख पाहुणे लिलावती हिरेमठ रवी बजंत्री आनंद चव्हाण, महेश फगरे, अशोक शिंत्रे विश्वास पवार, राजेश लोहार,आनंद सोमण्णाचे उमेश कुलकर्णी व इतर.