बेळगाव ग्रामीणमध्ये म.ए. समितीतर्फे ॲड. सुधीर चव्हाण इच्छुक उमेदवार
बेळगाव ( प्रतिनिधी )
कंग्राळी बुद्रुक येथील महाराष्ट्र एकिकरण समितीचे युवा नेते व सतत अन्याय झालेल्या समिती कार्यकर्त्यांची न्यायालयीन मोफत सेवा करून निर्दोष सुटका करून समितीच्या कार्यकर्त्यांला न्याय देणारा समितीचे युवा नेते ॲड.सुधीर चव्हाण बेळगाव ग्रामीण मतदार संघातून इच्छुक उमेदवार असल्याचे डी मीडियाशी बोलताना सांगितले .
बेळगाव येथील म . ए . समितीचे युवा नेते व बेळगाव जिल्हा वकिल संघटनेचे उपाध्यक्ष ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत असताना मराठा मंदिर येथे सलग चार वर्षे मराठीचा जागर करण्यासाठी
साहित्य संमेलन यशस्वीपणे भरविली आहेत . सीमाभागात हा मराठीचा जागर करत मराठी भाषा , संस्कृती व अस्मितेच्या लढ्याला पाठबळ देण्याचे कार्य करीत आहेत .
ॲड.सुधीर चव्हाण हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे बेळगाव शाखेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळत आहेत. गेली २० वर्षे समिती कार्यकर्ता ते युवा नेता म्हणून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कायदेशीर बाबीत सल्ला देतात .
बेळगाव क्षत्रिय मराठा परिषदचे जिल्हा सरचिटणिस , वकिल संघटनेत अनेक पदे भूषविली आहेत. विविध संस्था , पतसंस्था यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. सुराज्य निर्माण संघाच्या माध्यमातून अनेक सामूहिक विवाह सोहळा पार पडला आहे .
म. ए. समिती व मराठी कार्यकर्त्यांच्यावरील खटल्यांचे ते विनामोबदला न्यायालयीन कामकाज करतात तसेच रिंगरोडच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते पूर्णवेळ लढ्याची कायदेशिर बाजू सांभाळतात.
बेळगांव तालुक्यातील साहित्य संमेलनाला आर्थिक मदत सढळ हस्ते करतात . याबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिल जपत शैक्षणिक ‘ सांस्कृतिक , धार्मिक व राजकिय क्षेत्रात झोकून देऊन काम करत असतात.
सर्वगुण संपन्न असणारा , निष्कलंक ,उच्च विद्याविभूषीत व कायदेतज्ञ असल्याने सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाची लढाई व विधान सभेत मराठीचा मुद्दा प्रखर पणे मांडणारा हा सक्षम उमेदवार इच्छुक म्हणून समितीला कळविले आहे .
मराठी भाषा , संस्कृती जतन करण्यासाठी ते कार्यरत असतात