ऍड राम आपटे यांचे निधन
राणी चन्नम्मा नगर येथील रहिवासी आणि बेळगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट राम आपटे वय 97 यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी देहादान केल्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शना करीता त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी समाधान बिल्डिंग श्रीराम कॉलनी दुसरा स्टेज राणी चन्नम्मा नगर येथे ठेवण्यात येणार आहे. ते 1926 साली जन्मलेले भारतीय स्वातंत्र्या लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनलेले तसेच पुढे सीमा प्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय होते.