बाल नाट्य संमेलनाला अभिनेते सुबोध भावे व साई लोकूर यांची प्रमुख उपस्थिती
संत मीरा हायस्कूल मध्ये 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी बाल रंगभूमी अभियान मुंबई आयोजित पहिले नाट्य संमेलन भरणार आहे.
या नाट्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते सुबोध भावे आणि सई लोकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पहिल्यांदाच बाल नाट्य संमेलनाचे बेळगाव मध्ये आयोजन करण्यात आले असून हे नाट्य संमेलन सुमारे 300 मुलांकरिता संपूर्ण मोफत असणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या बाल नाट्य संमेलनाला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या मीना नाईक या संमेलनाच्या अध्यक्षा असणार आहेत
या बालनाट्य संमेलनात रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत बाळ रंगभूमी अभियाना करिता काम करणारे मुंबई पुण्यातील तज्ञ मंडळी 300 मुलांकरिता अभियानाची कार्यशाळा घेणार आहेत.
तर या संमेलनाचे उद्घाटन बेळगावच्या प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच या संमेलनाला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.