फसवणूक केल्याच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता
भावाच्या नावांवर असलेली जमीन “मीच तो” असे दाखवून खोटी कागदपत्रे तयार करुन दुसऱ्या व्यक्तीला सब- रजिस्ट्रार, खानापूर येथे खरेदीपत्र करून फसवणूक केल्याच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे .
खानापूर येथील प्रधान सिव्हील व जे. एम्. यफ्. सी न्यायालयाच्या न्यायाधिशानी साक्षिदारातील विसंगतीमुळे सदरी आरोपी संभाजी ओऊळकर यांची निर्दोश मुक्तता केली आहे.
याबाबत माहिती अशी की विलास मारुती ओऊळकर, वय वर्षे: ५५, राहणार: गौळवाडी, पोस्ट: बसर्गे, ताः चंदगड, जि: कोल्हापूर. यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरुन खानापूर फिर्यादी विलास ओऊळकर यांचे खानापूर तालुक्यातील बैलूर गावामध्ये सर्व्हे नं. ५/१, क्षेत्र ४ एकर २२ गुंठे जमीन नावावर आहे.
सदरी जमीन आरोपी संभाजी याने मीच विलास ओऊळकर आहे असे दर्शवून फसवण्याच्या उद्देशाने सदरी जमीनीची खोटी कागदपत्रे तयार करुन श्री. मुरलीधर जाधव यांना मीच विलास ओऊळकर असे दर्शवून सख्ख्या भावाच्या नावावर असलेली जमीन दिनांक: १३-०१-२०१२ रोजी खानापूर सब रजिस्ट्रार ऑफीसमध्ये दोन साक्षिदार उभे करून खरेदीपत्रावर त्यांच्यासह्या करून घेऊन सरकारी अधिकान्यांसमोर मीच विलास ओऊळकर आहे असे सांगून फोटो काढून घेऊन माहित असताना सुध्दा खोटी सही करुन फसवेगिरी करून खोटी कागदपत्रे सरकारला हजर करून जमीनीची खरेदी पत्र केल्याचा गुन्हा केला.
त्यानंतर फिर्यादी यांना सदरी प्रकरण समजले त्यानंतर फिर्यादी विलास ओऊळकर यांने आपला भाऊ संभाजी यांच्यावर दिनांक: ११-१०-२०१३ रोजी खानापूर पोलीसात भा. द. वी कलम ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ४२०, ५०६ गुन्हा दाखल केला. त्यानंतर सदरी आरोपीने बेळगांव येथील दुसरे अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन करुन घेऊन खानापूर पोलीसात हजर झाले, त्यांनतर खानापूर पोलीसांनी प्रकरणाचा तपास करुन खानापूर न्यायालयात, सदरी आरोपी संभाजी ओऊळकर विरुध्द दोषारोप दाखल करण्यात आले.
न्यायालयात फिर्यादी व इतर साक्षिदारांची पडताळणी करण्यात आली होती पण साक्षिदारांतील विसंगतीमुळे सदरी आरोपी संभाजी मारुती ओऊळकर (निवृत शिक्षक) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. मारुती कामाण्णाचे व अॅड. मारुती कदम यांनी काम पाहिले.