बेळगाव : विविध ८ ठिकाणच्या मंदिरांमध्ये चोरी करून, मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याना करण्यात गजाआड हारुगेरी पोलिसांना यश आले आहे . अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल ११,५२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद तसेच डीसीपी श्रुती यांच्या मार्गदर्शखाली पोलिसांचे एक पथक तयार करून या प्रकरणाचा तपास
करण्यात आला असून चोरी प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींनी अलगवाडी, बस्तवाड, मुगळखोड, हिडकल, हारुगेरी, निडगुंदी आणि सत्ती या गावात एकूण ८ मंदिरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून, चोरी करण्यात आलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि १२०,००० रुपये युनिकॉर्न किमतीची होंडा मोटारसायकल असा एकूण ११,५२,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हारुगेरी पोलीस स्थानकाचे सीपीआय डी. बी. रविचंद्र यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मलप्पा पुजारी, बी. एल. होसट्टी, रमेश पुरदिमनी, ए. ए. शिंदे, पी. एम. सप्तसागर, एच. आर. आंबी, विनोद ठकन्नावर यांनी तपास केला. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.