This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*चोरी केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता*

*चोरी केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता*
D Media 24

बेळगांव:शनिवार खुट काकतीवेस रोड, बेळगांव येथील घटना रात्रीच्या वेळी मोबाईल शॉपचे लोखंडी रॉडने शट्टर कट करुन उघडुन आत घूसुन १३ मोबाईलची धाडसी चोरी केल्याच्या आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता झाली आहे.येथील तिसरे जे.एम.एफ.सी न्यायालयाने साक्षीबारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी आरोपी अतीक महम्मबहुसेन पटेल, वय: 24 वर्षे, राहणार: चिराग नगर,बेळगांव याची निर्दोष मुक्तता केली.

खडेबजार पोलिसात फिर्यादी अरुण सुब्रमणम गौडर, श्री. लक्ष्मी मोबाईल सेल आणि सर्व्हिस शॉप (दुकानाचे मालक) राहणार श्री. आर्केड कॉमप्लेक्स काकतीवेस रोड, शनिवार खुट बेळगांव यांच्या फिर्यादीवरुन दिनांक १३/०२/२०१२ रोजी रात्री ठिक १० वाजता श्री. आर्केट कॉमप्लेक्स शनिवार खुट काकतीवेस रोड बेळगांव आपले मोबाईलचे दुकान बंद करून गेले. त्यानंतर दुसरे दिवशी सकाळी १४/०२/२०१२ रोजी सकाळी ठिक १०.३०वाजता दुकानला येवुन पाहतात तर दुकानचे रात्रीच्या वेळी मोबाईल शॉपचे लोखंडी रॉडने शट्टर कट करून उघडुन आत घूसुन १३ मोबाईलची चोरी झाली होती त्याची एकुण किमंत रुपये ३०१५०/- धाडसी चोरी केल्याचे समजुन आले.

त्यानंतर फिर्यादी अरुण याने खडेबजार पोलिसात जावुन अज्ञाता विरुध्द चोरी झाल्याचे फिर्याद दाखल केली. पोलिसानी भा. द. वि. कलम ४६७,३८० कलमाखाली गुन्हा दाखल केला. खडेबाजार पोलिसानी तपास चालु केला. तपासा दरम्यान सदरी आरोपी अतिक हा ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचे दिसुन आले. त्यानंतर सदरी आरोपीला अटक करण्यात आले. त्यानंतर खडेबाजार पोलिसाचे पि. एस. आय श्री. व्हि. एन. पाटील यांनी खटल्याचा पुर्ण तपास करुन न्यायालयात सदरी आरोपी विरुध्द दोषारोप दाखल केले. न्यायालयात ७ साक्षिदार २५ कागदोपत्री पुरावे व दोन मुद्देमाल तपासण्यात आले.आरोपीच्या वतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.