अबकारी खटल्यातून आरोपीची निर्दोष सुटका
बेळगांव: पास व परमिट गोवा राज्यातील दारू व बियर बॉटल ची ६ चाकी गुडस वाहनातून विकण्यासाठी म्हणून घेऊन जाताना. बेळगांव जांबोटी हायवेरोड पोलीस वा इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने येणाऱ्या गाडीची तपास करत असताना रंगेहात सापडलेल्या आरोपीचे साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी येथील तिसरे जे.एम.एफ.सी न्यायालयाचे न्यायाधीशांनी सदर आरोपीची निर्देश मुक्तता केली आहे.
आरोपींची नावे १. शंकर लक्ष्मण पवार वय वर्ष ४५ राहणार कुरबर गल्ली नंदीहळ्ळी ता.जि.बेळगाव २. सुरेश परशराम शिंदे वय वर्ष ५० राहणार विनायक नगर हिंडलगा ता.जि. बेळगाव.
दक्षिण वलय अबकारी पोलीस ठाण्याचे पी.एस.आय प्रतिभा हितलमणी यांनी दिलेल्या फर्यादीनुसार
तारीख २७/१०/२०१८ रोजी दुपारी १.३० वाजता फिर्यादी व इतर पोलीस स्टाफ खात्री दायक बातमी मिळाल्या प्रमाणे बेळगांव तालुक्यातील किणये बस स्थानकापासून किलोमीटर अंतरावरील जांबोटी बेळगाव हायवे रोडवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना टाटा गुड वाहन नंबर बी फोर सिक्स फोर सिक्स या वाहनाची तपासणी केली तपासणी करत असताना गुड्स गाडीमध्ये गोळ्या राज्यातील दारू बॉटल्स १. रॉयल स्ट्राइक विस्की ची बारा बॉटल्स (एकूण ९ लिटर), किंगफिशर स्ट्रॉंग ची 24 बॉटल (एकूण १२ लिटर) असे गाडी सापडले.
गाडीमध्ये सदरी वरील आरोपी यांच्याकडे असतो पण कुठे चौकशी केली असता आढळले नाहीत म्हणून २ महिने पंचासक्षम सदरीवाहन दारू बद्दलचा पंचनामा करून जप्त करण्यात आले त्यानंतर सदरी आरोपीवर अबकारी कायदा कलम १०,११, १२,१४,१५,३२( १), ३४, ३८ (ए), ४३ प्रकारे गुन्हा दाखल करून सदरील आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यानंतर सदरील गुन्हा तपास करून सदरील आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते. आरोपीच्या वतीने वकील मारुती कामान्याचे यांनी काम पाहिले.