कोल्हापूरहून बेळगावला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बस आणि टीप्पर यांचा अपघात झाल्याने चाळीस हून अधिक विद्यार्थी जखमी झाले.
भूतरामनहट्टी येथील प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी विद्यार्थी कोल्हापूर येथून बसने आले होते.प्राणी संग्रहालय बघून जात असताना अपघात घडला.
बस यु टर्न घेत असताना टिप्परने धडक दिल्याने अपघात घडला.अपघात झाल्यावर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलवण्यात आले.जखमी विद्यार्थ्यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीत अपघात घडला.