बेळगांव:अपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटलिटी अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन पुण्यातील लेमन ट्री 5 स्टार हॉटेलमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अकॅडमीच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आला होता.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट कोरिओग्राफर विकी सुभेदार हे उपस्थित होते.
विकी सुभेदार तसेच अपटेक एव्हिएशनचे अकॅडमीचे व्यवसायिक भागीदार विनोद बामणे व सरस्वती इन्फोटेक च्या एम.डी.ज्योती बामणे यांच्या शुभहस्ते रोपट्याला पाणी घालून सत्कार कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
पुणे येथील लेमन ट्री 5 स्टार हॉटेलमध्ये निवड झालेले विद्यार्थी विजय पुजार, लक्ष्मण कडाबी ,गौरी नवनी यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आला.