ओम नगर,ओल्ड गुड शेठ रोड,शास्त्रीनगर कपिलेश्वर कॉलनी महाद्वार रोड येथे प्रचार
ओम नगर मध्ये अनेक विकास कामे राबविण्यात आली आहेत तसेच याच प्रकारची विकास कामे अखंडितपणे चालू राहावे याकरिता या भागातील नागरिकांनी आपल्या पाठिंबा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण विभागाचे अधिकृत उमेदवार आमदार अभय पाटील यांना दर्शविला आहे.
अभय पाटील यांनी आज दक्षिण भागातील ओमनगर मध्ये आपला प्रचार केला. यावेळी नागरिकांनी त्यांनी केलेल्या विकास कामांची पोच पावती अभय पाटील यांना दिली. तसेच विधानसभा निवडणूकीत नागरिकांनी त्यांना विजयी करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यंदादेखील आपल्याला जनतेचे सेवा करण्याचे भाग्य लाभावे याकरिता दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शनिवारी सकाळी दैवज्ञ मंगल कार्यालय येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली.
त्यानंतर ओल्ड गुड शेठ रोड मधील सर्व प्रभाग शास्त्रीनगर कपिलेश्वर कॉलनी महाद्वार रोड येथे प्रचार केला.
यावेळी या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा लाभला. तसेच येणाऱ्या काळात सर्वांनी अभय पाटील यांना निवडून देण्याचा निर्धार केला.