वादग्रस्त रिल्सबद्दल तरुणाला अटक
बेळगाव:
वादग्रस्त रील तयार करून व्हायरल केलेल्या तरुणाला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.
मुशरफ उर्फ मुशरफ खान आप्पालाल नाईक (वय 25, राहणार मेकलमर्डी) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुशरफ नाईक याने 28 मार्च रोजी हातात शस्त्रे घेऊन सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.https://dmedia24.com/vigilance-needed-to-take-grass-from-the-trolley/
यातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करून सोशल मीडियाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा या तरुणाविरुद्ध नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली. मुशरफ नाईक याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.