पाटील गल्ली येथील घराला अचानक आग
पाटील गल्ली येथील घराला अचानक आग लागून गृहोपयोगी साहित्य तसेच संगणक आदी आगीत जळून खाक झाले.आगीत दहा लाखाहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घर मालकांनी व्यक्त केला आहे.एक वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.
आग लागल्यावर छप्पराने पेट घेतला.बघता बघता आगीत गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले.आगीत तेथील फोटो स्टुडिओत असणारा संगणक आणि अन्य साहित्य देखील आगीत भस्मसात झाले.
आग लागल्याचे समजताच घर मालकांनी त्वरित अग्निशामक दलाला कळवले.अग्निशामक दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन करून आग विझवली.आगीचे वृत्त कळताच बघ्यांनी तेथे गर्दी केली होती.दूरवरून धुराचे लोट दिसत होते .पोलिसांनी त्वरित पाटील गल्लीतून जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली.