श्रीराम सेना हिंदुस्तान च्या वतीने पोलीस आयुक्तांना यासाठी देण्यात आले निवेदन
जनतेचे रक्षक आता भक्षक झाल्या असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्तानच्या पदाधिकाऱ्यांनी केला गांजा प्रकरणी खुलेआम फिरणारे आरोपींना अटक न केल्याने त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावे आणि गांजाच्या समोर प्रकरणाचा नायनाट करावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांना केली.
शहराच्या दक्षिण भागात गांजा प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.या ठिकाणी महाविद्यालय त्यासह लोकवस्ती आहे मात्र या ठिकाणी गांजा अफीम याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी आज श्रीराम सेना हिंदुस्तान च्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोरलिंगया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .
शहरात गांजा अफीम यासारखे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र यावर कोणाचाही वचक नसल्याचे दिसून येत आले आहे. गेल्या चार दिवसापूर्वी शहरात सापडला होता मात्र यावेळी पोलिसांनी याप्रकरणाकडे काना डोळा केला असल्याचे श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले.
तसेच गांजा विकणाऱ्यांना रातोरात सोडण्यात आले असल्याची माहिती यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी पोलीस आयुक्तांना दिली तसेच या प्रकरणी राजकीय व्यक्तीचा हात आहे असे सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्तांनी हे घडलेले प्रकरण साफ चुकीचे असून गांजाचा नायनाट करणार असल्याची ग्वाही दिली.
तसेच लवकरात लवकर या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी करू असे यावेळी सांगितले. तसेच या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तान चे कार्यकर्ते उपस्थित होते .