कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव धारवाड रेल्वे मार्ग निर्मितीचे काम त्वरित सुरू केले जावे त्याचबरोबर वीज बिलादरात दर वाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी आज कर्नाटक रक्षण वेदिकेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले यावेळी बोलताना कर्वेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी वीज दरवाढ कमी करावी त्याचबरोबर बेळगाव ते धारवाड नव्या रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी केली.
यावेळी ते म्हणाले की बेळगावचे प्रवाशांना लोंढा मार्गे धारवाड असा प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवाशांचे अंतर वाढण्याबरोबरच वेळही वाया जात आहे त्यामुळे कित्तूर मार्गे बेळगाव धारवाड असा नवा रेल्वे मार्ग झाल्यास वेळेची बचत होण्याबरोबरच प्रवासाचे अंतर देखील कमी होईल तेव्हा या निवेदनाचा विचार करून सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
यावेळी कन्नड रक्षण वेदिका बेळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्वे च्या सदस्यांनी निवेदन दिले याप्रसंगी गणेश रोकडे सुरेश गवंनावर यांच्यासह आणि कार्यकर्ते उपस्थित होते