स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाचा प्रकार चव्हाट्यावर
वडगाव ते अनगोळच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून संततधार पडणाऱ्या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
अनगोळ ते वडगाव मार्गावर अवघ्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या विकास काम खचले असल्याने कामात करण्यात आलेला बेजबाबदार पुन्हा उघडकीस आला आहे.
काल झालेल्या जोरदार पावसाने येथील रस्ता खचला असून धोकादायक रस्त्यावर मुसळधार पावसात अंदाज न आल्याने रात्रीच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
आकाश पाटील राहणार खादरवाडी असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
यावेळी या प्रकरणाची माहिती श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांना मिळताच त्यांनी वडगाव ते अनगोळ रस्त्याला मिळण्याची पाहणी केली आणि अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदाराला घटनास्थळी बोलावून येथील काम युद्ध पातळीवर करण्यास सांगितले. कंत्रालदाराला जखमी युवकाचा खर्च उचलण्या सांगितल्यास यावेळी त्याने ते मान्य देखील केले यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे सर्व सदस्य उपस्थित होते.
I’m extremely impressed along with your writing skills as neatly as with the layout to your weblog. Is that this a paid subject matter or did you modify it your self? Anyway stay up the nice high quality writing, it’s rare to look a nice blog like this one nowadays!