सहा दिवसीय दुबईचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा
बेळगाव येथील केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विद्यार्थ्यांसाठी 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान सहा दिवसीय दुबईचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यादरम्यान, विद्यार्थ्यांनी दुबई सिलिकॉन ओएसिस प्राधिकरणाच्या डी-टेक (दुबई तंत्रज्ञान उद्योजक केंद्र) इनक्यूबेशन सेंटरला भेट दिली आणि स्टार्ट-अप इको सिस्टीम आणि उद्योजकता कार्यक्रमांबद्दल जाणून घेतले.
तसेच, हेरियट-वॅट युनिव्हर्सिटी, दुबई कॅम्पस, पोलारिस इंटरनॅशनल इंडस्ट्रीज (एल एल सी ) या प्रीमियम फर्निचर कंपनीने हाती घेतलेल्या पुरवठा साखळी व्यवस्थापन, सेवा व्यवस्थापन आणि विपणन उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.
दुबई मधील पॅकेजिंग बॉक्सचा सर्वात मोठा पुरवठादार, डिसेंट प्रिंटिंग प्रेसला भेट देऊन, विद्यार्थ्यांनी ब्रेडिंग आणि जाहिरात आणि छपाईबद्दल जाणून घेतले. डॉ. नुपूर, डॉ. संजय, डॉ. अमीत आणि प्रा. संजीवनी यांनी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा सांभाळला.
एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहलीचे आयोजन करण्याची संधी आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल केएलएस व्यवस्थापनाचे आभार मानले.