भाजपला शॉक कृष्णा अनगोळकर सह अनेक कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस प्रवेश
राज्य लोकर महामंडळाचे अध्यक्ष कृष्णा अनगोळकर, बिरा अनगोळकर यांच्यासह शेकडो नेत्यांनी शुक्रवारी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्टेट वूल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व डीसीसी बँकेचे संचालक कृष्णा अनगोळकर, बीरा अनगोळकर यांच्यासह शिंदोली गावातील अनेक नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षाच्या तत्त्वांना मान्यता देत अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला.
ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सांबरेकर, रमेश सांबरेकर, नेते राघवेंद्र कोळकर, बागू कारेगार, विठ्ठल बेळगावकर, भरमा बेळगावकर, महांतेश केंगेरी, रमेश अनगोळकर, बगाप्पा अनगोळकर, बसवराज आगासिमणी आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यभरातील विविध पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येण्याची खात्री असून बेळगाव जिल्ह्यात किमान 12 जागा जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विजय निश्चित असून, गतवेळच्या तुलनेत किती फरक पडतो हे पाहायचे आहे.
चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, बेळगाव ग्रामीण मतदारसंघासह अनेक मतदारसंघात अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष मोठ्या प्रमाणात बळकट होत असून अपेक्षेपेक्षा काँग्रेसचा विजय होईल, असे ते म्हणाले.