This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2025
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*शेतकऱ्यांना भरपाई, जनतेला आनंदाचा शिधा देणारे संवेदनशील सरकार*

*शेतकऱ्यांना भरपाई, जनतेला आनंदाचा शिधा देणारे संवेदनशील सरकार*
D Media 24

शेतकऱ्यांना भरपाई, जनतेला आनंदाचा शिधा देणारे संवेदनशील सरकार

भाजपा जिल्हाध्यक्ष खा.डॉ.अनिल बोंडे यांनी केले महायुती सरकारचे अभिनंदन

अमरावती – जून-जुलै महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ १,०७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे, तर आनंदाचा शिधा वाटपात पोहे आणि मैद्याचा समावेश झाल्याने सामान्य कुटुंबांचे दिवाळीचे दिवस अधिक आनंदाचे होणार आहेत, अशी भावना भाजपाचे जिल्हा अध्यक्ष खा.डॉ.अनिल बोंडे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली.

जनतेच्या हितासाठी संवेदनशील असलेल्या महायुती सरकारचे भाजपा अभिनंदन करत आहे , असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त वितरित होणाऱ्या आनंदाचा शिधा संचात रवा, चणाडाळ, साखर, व खाद्यतेलासोबत मैदा आणि पोहे यांचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असून शिधा पत्रिकाधारकांना १०० रुपयात १ किलो साखर,१ लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ,मैदा आणि पोहे असा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सणासुदीचे दिवस गोड होणार असून आपत्तीग्रस्त बळीराजालाही दिलासा मिळणार आहे, असे खा.डॉ.अनिल बोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जून-जुलै २०२३ या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या आणि शेतजमिनीच्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने १ हजार ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्यातील १४ लाख ९ हजार ३१८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागणार नाहीत, अशी माहितीही त्यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे. मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीची रक्कम याबाबतचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही खा.डॉ.अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले. जनहिताच्या प्रश्नावर संवेदनशीलता आणि शासकीय व्यवहारांत पारदर्शकता यामुळे महायुती सरकार हे आदर्श सरकार ठरले असून भाजपाला त्याचा अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

2 Comments

  • I enjoy you because of every one of your labor on this website. Betty take interest in participating in investigations and it is simple to grasp why. A lot of people hear all concerning the powerful form you give effective secrets via your blog and even cause response from other individuals about this topic plus our favorite girl is starting to learn a great deal. Have fun with the rest of the new year. You are doing a really good job.

  • It’s actually a cool and helpful piece of information. I’m satisfied that you just shared this helpful information with us. Please keep us informed like this. Thank you for sharing.

Leave a Reply