दूध सागर धबधबा येथे रेल्वे रुळावर दुसऱ्यांदा कोसळली दरड
सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक झाडांची पडझड झाली आहे त्यातच दूध सागर धबधबा येथे रेल्वे रुळावर दुसऱ्यांदा दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दुध सागर ला जाणारा रस्त्यावर कॅसरलॉक पासून तिसऱ्या बोगदाजवळ मंगळवारी दरड कोसळल्याने मंगळवारपासूनच येथील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्या सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत.
तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा दूध सागर जवळ दरड कोसळले असल्याने दगड हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे डोंगराचा भाग पूर्णपणे लोहमार्गावर आल्याने माती आणि दगड रुळावर मोठ्या प्रमाणात अडकून राहिले आहे त्यामुळे ते काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.