काजूला समाधानकारक दर
उत्पादकांमधून समाधान
बेळगाव:
काजू पिकाला समाधानकारक दर मिळाल्याने काजू उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
चालू वर्षी काजू पिकांच्या मोहरला खराब हवामानाचा फटका बसला. त्यामुळे चालू वर्षी काजू पिकाचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच सुरुवातीला काजू पिकाला योग्य दर मिळाला नव्हता. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्रा आता काजूला समाधानकारक दर मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग खुश झाला आहे.
बेळगाव तालुक्यामध्ये काजूच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेष करून तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या काजू बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. एकेका शेतकऱ्यांच्या अनेक एकरांमध्ये या काजूच्या बागा आहेत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक येते. जर दर घटला तर त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. जर समाधानकारक दर मिळाला तर त्यांचे चांगले उत्पन्न त्यांना मिळते. सध्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्ग खुश आहे.
काजू व्यापारी ग्रामीण भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांकडून या काजू विकत घेत आहेत. मात्र यामध्ये काटामारीचा प्रश्न उपस्थित होत आहे.