येथे अमरनाथ, व वैष्णव देवीची साकारणार प्रतिकृती
तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त येथील नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात जोतिबाला आणि शिवपिंडीला लघुरुद्राभिषेक करण्यात येणार आहे.
तसेच मंदिरात केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून अमरनाथ, आणि वैष्णव देवीची प्रतिकृती देखील साकारण्यात येणार आहे.
त्यामुळे बेळगावकरांनी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात येऊन देवाचे दर्शन घ्यावे असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.