*चिखलाच्या दलदलीतून शोधली चिमुकल्यांच्यासाठी वाट*
कंग्राळी खुर्द गावातील वार्ड क्रमांक 10 च्या विभागातील अंगणवाडी समोर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते त्याचा त्रास तिथून ये जा करणाऱ्या चिमुकल्यांना होत होता हे जाणून अंगणवाडी शिक्षकांनी त्या विभागाच्या ग्रामपंचायत सदस्यांना संपर्क साधून चिखलामुळे लहान मुलांना त्रास होत आहे असे कळविताच ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील यांनी लागलीच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घेऊन तिथे चीपिंग घालून रस्ता निर्माण करून दिला.
तसेच कॉर्पोरेशन मध्ये येणाऱ्या ज्योती नगर विभागाच्या मेल रोडवरील कचरा कॉर्पोरेशन जाणून बुजून तो उचलण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते ही बाब देखील राकेश पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घेऊन तेथील परिसराला मोकळा श्वास दिला.