कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ यात्रे निमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शौकीन उपस्थित होते.
बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शौकीन बैलजोड्या आणि घोडे घेऊन सहभागी झाले होते.बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत पाहण्यासाठी कर्नाटक,महाराष्ट्रातून शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.खुल्या गटातील बैलगाडी शर्यतीत शिंदेवाडीच्या राहुल शिंदे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
दानोळी येथील बंडा खिलारी यांच्या बैलजोडीने द्वितीय तर नंदनाळच्या रणजीत पाटील यांच्या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला.घोडागाडी शर्यतीत दत्ता डोलगोरे यांच्या घोड्यानी प्रथम क्रमांक पटकावला.