बेळगाव:वनिता विद्यालय जवळ गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीला श्रीराम सेना हिंदुस्तान आणि यंग बेळगाव फाउंडेशनच्या वतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.बोगरवेस येथील वनिता विद्यालय शाळेजवळ एक व्यक्ती मॅगोट्सची लागण झालेला व्यक्ती सहाय्य अवस्थेत आढळून आला.त्याची प्रकृती पाहून स्थानिकांनी तातडीने श्रीराम सेना हिंदुस्तान व यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली.
माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. त्याला संसर्गजन्य रोग झाल्याने त्याची विशेष काळजी घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना सांगितले.तो हिंडलगा येथील रहिवासी असून त्याला कुटुंबाने सोडून दिल्याने त्याची परिस्थिती आणखीच दुःखद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
नारू निलजकर,ॲलन विजय मोरे,अवधूत तुडवेकर यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, कॅम्पचे पोलीस अधिकारी मुल्ला सर इतर अधिकारी, रुग्णवाहिका टीम, स्थानिक रहिवासी व श्री राम सेना हिंदुस्थान,यंग बेळगाव फाउंडेशनच्या सदस्य यांच्या मदतीने बचावकार्य शक्य झाले.