गड किल्ल्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला मोठे प्रोत्साहन मिळते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले निर्माण करायची परंपरा असून हलशीवाडी गावात देखील चांगले गड किल्ले निर्माण केले जात आहेत. त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन गुंडपी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी केले.
हलशीवाडी येथे युवा स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गाव मर्यादित किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरूवारी विठ्ठल मंदिर परिसर येथे पार पडला. प्रारंभी विष्णु देसाई यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माईचे पूजन करण्यात आले. तर बळवंत देसाई, दत्तात्रय देसाई, पुंडलिक देसाई, सुनिल देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी ध्येय व प्रेरणा मंत्र म्हणत शिवरायांचा जयजयकार करण्यात आला.
युवा कार्यकर्ते यांनी रघुनाथ देसाई
प्रास्तविक करताना येणाऱ्या काळात गावातील बालचमुना गड किल्ले संवर्धन कशा प्रकारे करावे याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच येणाऱ्या काळात विविध गड किल्ल्यांना भेटी देण्याचे नियोजन केले जाईल अशी माहिती दिली.
मिलिंद देसाई यांनी स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश सांगत पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित केली जाईल अशी माहिती दिली.
त्यानंतर गावामध्ये किल्ले निर्माण केलेल्या बालचमुना हलशी कृषी पत्तीन सोसायटीचे संचालक अनंत देसाई, अर्जुन देसाई, रमेश देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व गड किल्ले यांची माहिती असलेली पुस्तके देऊन गौरविण्यात आले
राजन सुतार यांनी स्वागत तर प्रशांत देसाई यांनी आभार मानले. यावेळी गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.