भगवान श्री महावीर जयंती निमित्त बेळगावात भव्य शोभयात्रा काढण्यात आली. शोभयात्रेत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते.
धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झालेल्या शोभयात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनातील प्रसंग देखाव्याद्वारे साकारण्यात आले होते. भगवान महावीर यांचा जन्म सोहळ्याचा प्रसंग एका चित्ररथावर साकारण्यात आला होता.भगवान महावीर यांची मूर्ती एका रथात स्थापन करण्यात आली होती.
शोभयात्रेत अग्रभागी घोड्यावर किरीट घालून बसलेली मुले मुली साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.तरुणीच्या लेझीम पथकाने देखील आपली कला सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महिलांचे टिपरी पथक देखील शोभयात्रेत सहभागी झाले होते.https://dmedia24.com/khelo-india-fit-india-strong-india-skating-rally-rally/
शोभयात्रेच्या मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकाठिकाणी सडा घालून शोभयात्रेचे स्वागत करण्यात येत होते. शोभयात्रेच्या मार्गांवर अनेक संस्था आणि युवक मंडळातर्फे सरबत, ताक आणि लस्सीचे वितरण करण्यात आले. महावीर भवन येथे शोभयात्रेची सांगता झाली.